श्रीराम मंदिर निर्माणसाठी एक लाखांचा धनादेश सुपूर्द
सावदा : श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण निधी समर्पण अभियान अंतर्गत वढोदा येथे नुकतेच संत संमेलन झाले होते. यावेळी राम मंदिर निर्माणसाठी सर्व रामभक्त व कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आल्यानंतर संतांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तांदलवाडी येथील वसंत विश्वनाथ महाजन तांदलवाडी यांनी एक लाख एक हजार रुपयांचा धनादेश संतांकडे सुपूर्द केला. यावेळी महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज, सदगुरु शास्त्री भक्तिप्रसाददासजी आदी संत व मंदिर निर्माण निधी समिती सदस्य उपस्थित होते.

