होमगार्डच्या सतर्कतेने मूकबधीर प्रवाशाला मिळाली बॅग


भुसावळ : कर्तव्याप्रती इमानदारी असल्यास अशक्यप्राय बाबही शक्य होते, याचा परीचय भुसावळात आलेल्या प्रवाशाला आला. मूकबधीर प्रवासी अजित साळुंके (वाकड, जि.पुणे) हे औरंगाबाद जाण्यासाठी 8 रोजी दुपारी तीन वाजता बसस्थानकावर आल्याने त्यांनी बसमध्ये जागा सांभाळण्यासाठी बॅग टाकली व ते शौचास निघून गेले मात्र इकडे वेळ होताच बस मार्गस्थ झाली. यावेळी बसस्थानकावर होमगार्ड विनोद पाटील, विशाल मेघे यांच्याशी प्रवाशानी इशार्‍याद्वारे संपर्क साधत बॅगेत महत्वाचे कागदपत्र असल्याचे सांगितल्यानंतर पाटील यांनी वेळ वाया न घालता प्रवाशाला आपल्या दुचाकीवर बसवत नाहाटा महाविद्यालयापर्यंत गाडीचा पाठलाग केला मात्र तोपर्यंत गाडी पुढे निघून गेली. बसस्थानकावरील नियंत्रकाशी संपर्क साधून व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे बसचा क्रमांक मिळवल्यानंतर बस जामनेर आगाराशी संपर्क साधण्यात आला व बॅगेची माहिती देण्यात आली व पुन्हा जामनेर-भुसावळ बसद्वारे बॅगेत परत भुसावळात बोलावण्यात आली व बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या प्रवासी अजित साळुंके यांच्या ताब्यात देण्यात आली. नाईक उमाकांत पाटील, होमगार्ड विनोद पाटील, विशाल मेघे, अफसर सय्यद, सचिन कोळी यांनी याकामी सहकार्य करीत प्रवाशाला पुणे जाण्यासाठी लक्झरीत बसवून दिले.9




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !