कंडारीत भाविकांच्या सुविधासाठी दिले हॅण्ड सॅनिटायझर मशीन


भुसावळ : तालुक्यातील तापी नदी काठावरील कंडारी गावातील 500 वर्षांचा इतिहास असलेले अतिप्राचीन तीर्थक्षेत्र श्री कपिलेश्वर महादेव मंदिरच्या यात्रोत्सवानिमित्त येणार्‍या भाविकांच्या सुविधेसाठी भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ.नितु पाटील आणि परीवारातर्फे दोन स्वयंचलित इलेक्ट्रिक हॅण्ड सॅनिटायझर मशीन व इतर साहित्य भेट देण्यात आले.

14 रोजी कंडारीचा यात्रोत्सव
कंडारी गावात 14 जानेवारी रोजी मकरसंक्रातीला श्री कपिलेश्वर महादेव मंदिर परीसरात यात्रोत्सवाचे आयोजन केले जाते शिवाय यंदा कोरोना महामारीचा प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाने यात्रेला बंदी केली असली तरी भाविकांसाठी दर्शनाची मुभा दिली आहे. श्री कपिलेश्वर महादेव मंदिर व्यवस्थापनाकडून केलेल्या आवाहनाला भुसावळचे डॉ.नितु पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्यांच्या सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठानतर्फे श्री कपिलेश्वर महादेव यांचे दर्शन घेत देणगीरुपी मंदिराला दोन स्वयंचलित इलेक्ट्रीक सॅनिटायझर मशीन, 500 मास्क, 121 श्री शिवलीला अमृताचे 11व्या अध्यायचे पुस्तक आदी मंदिर व्यवस्थापक सदस्य मुरलीधर जेठवे यांच्ना सुपूर्द केले. यावेळी डॉ.नितु पाटील आणि परीवाराला मंदिराचा संपूर्ण इतिहास,जागेच महात्म्य आदी सांगण्यात आले. समस्त कंडारीवासीयांच्या वतीने डॉ.नितु पाटील, डॉ.रेणुका पाटील व परीवाराचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिर व्यवस्थापक सदस्य मुरलीधर जेठवे, विशाल सूर्यवंशी,वैशाली पाटील,वेदांत पाटील,दुर्वांग पाटील,कल्पना मोरे,चक्रवर्ती अशोक सम्राट प्रतिष्ठानचे अध्यक्ष विक्की मेश्राम,सुरेंद्र सोनवणे,संजय मोरे,राकेश मोरे,भूषण मोरे,चंद्रकांत साळुंके आदी ग्रामस्थ उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !