ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांची बदनामी : गुन्हा दाखल
यावल : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत सोशल नेटवर्कचा प्रचार वाढला आहे. यातचं प्रचार करतांना चिखलफेक होतांनादेखील दिसत आहे. अट्रावल ग्रामपंचायत निवडणुकीत आमदारांसह 11 उमेदवारांची सोशल नेटवर्कवर बदनामीकारक मजकूर टाकू बदनामी केल्याप्रकरणी संबंधीत ग्रुपसह एकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. संदेश यशवंत पाटील (रा. अट्रावल, ता.यावल) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गावातील डिगंबर पंडीत कोळी याने आपल्या मोबाईलच्या सोशल नेटवर्कवर अट्रावल ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेसप्रणित महाविकास एकता पॅनलच्या प्रचार प्रॉम्प्लेटचा फोटो काढुन बदनामी कारक मजकुर लिहुन स्टेटसवर ठेवत गावातील जय वाल्मिक संघटना ग्रुप या व्हॉटसअप ग्रुप वर पाठवुन बदनामी केली. आमदार शिरीष चौधरी यांची तसेच महाविकास एकता पॅनेलच्या 11 उमेदवारांची बदनामी केल्याप्रकरणी संबंधित ग्रुपसह एकाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

