साकळीत दारू पिवून धिंगाणा : एकास अटक
यावल : तालुक्यातील साकळी येथे रविवारी एकाने दारू पिऊन मुख्य चौकात धिंगाणा घातल्याप्रकरणी यावल पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करीत एकाला अटक केली. न्यायालयाने त्यास त्यास 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली. या कारवाईमुळे सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घलणार्यांना चपराप बसली आहे. साकळी, ता.यावल येथे रविवारी हजरत सजनशाह वली(रहे.) यांचा उरूस असताना गावातील मुख्य चौकात पांडूरंग नामदेव मराठे (55) हा दारू पिऊन धिंगाणा घालत होता. सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणार्या मराठे यांच्याबाबत नागरीकांनी यावल पोलिसांना माहिती दिल्यानंतर निरीक्षक सुधीर पाटील, उपनिरीक्षक जितेंद्र खैरणार, हवालदार प्रमोद चौधरी, राजेश वाढे आदींनी त्यास ताब्यात घेतले. प्रथमवर्ग न्यायालयात न्या.डी.जी.जगताप यांच्या न्यायासनापुढे मराठे यास हजर केले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

