भुसावळात माजी खासदार आनंदराव अडसुळ यांचे स्वागत
भुसावळ : रेल्वे स्थानकावर रेल कामगार सेनेचे केंद्रीय अध्यक्ष व शिवसेना नेते माजी खासदार आनंदराव अडसूळ आल्यानंतर त्यांच्याशी रेल्वे कर्मचार्यांनी चर्चा केली. भुसावळ विभागात रेल्वे प्रशासनातर्फे कामगारानवर होत असलेल्या अन्याय-अत्याचाराबाबत सखोल चर्चा करण्यात आली तसेच पदाधिकारी यांना निलंबीत करण्यात आल्याने त्याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी रेल कामगार सेनेचे मंडळ अध्यक्ष ललितकुमार मुथा, प्रदीप भुसारे, राकेश पाठक, अब्दुल अजीज, सुरेंद्र यादव, शांताराम सपकाळे, रणजीत राजपूत, गौतम, काटे, एडवीन माइकल, रावत, रजक, मानवेंद्र वर्मा, भरत शर्मा, मुकेश महाजन, प्रमोद हिवरे, अरुण सोले, शेख शकील शेख सत्तार (तम्मा पहेलवान ), हाजी शेख शकील व इतर कार्यकर्ते हजर होते.

