हजरत निजामुद्दीन-हुबली स्लिपर कोच रद्द
भुसावळ : हजरत निजामुद्दीन मडगाव विशेष गाडीला जोडण्यात येणारा हजरत निजामुद्दीन-हुबळी आणि हुबळी-हजरत निजामुद्दीन स्लीप कोच रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. गाडी क्रमांक अप 02780 हजरत निजामुद्दीन हुबली स्लीप कोच हा प्रस्थान स्टेशनपासून 13 जानेवारीपासून रद्द करण्यात आला आहे. डाऊन 07305 डाऊन हुबली हजरत निजामुद्दीन स्लीप कोच हा प्रस्थान स्टेशनपासून 11 जानेवारीपासून रद्द करण्यात आला आहे. रेल्वे प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

