वरणगाव नगरपरीषदेवर मोर्चा


फुले नगरातील सभागृहाला महात्मा फुलेंच्या नावाला विरोध दर्शवल्याने माळी समाज आक्रमक

वरणगाव : शहरातील महात्मा फुले नगरातील नगरपरीषदेच्या माध्यमातून बांधण्यात आलेला सामाजिक सभागृहाला क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या नावाला काही राजकीय व्यक्तींनी विरोध केल्याने मंगळवारी सकाळी 11 वाजता क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या नावाला कोण विरोध करत आहे? त्यांचे नाव आम्हाला सांगा ? असा माळी समाज बांधवानी आक्रमक पवित्रा घेत नागरपरीषदचे मुख्याधिकारी श्यामकुमार गोसावी यांना जाब विचारत शेकडो समाजबांधवांच्या संख्येने वरणगाव पालिकेवर मोर्चा काढल्याने शहरात खळबळ उडाली.

सभागृहात नाव देण्यासाठी राजकीय व्यक्तींचा विरोध
नगरपरीषदेच्या माध्यमातून महात्मा फुले नगरात महात्मा फुले सामाजिक सभागृह बांधणात आले आहे. या सभागृहाचे काम रंगरंगोटीचे काम अंतिम टप्यात आले आहे. या सभागृहाला थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले सामाजिक सभागृह असे टाकण्याचे ठरविले होते परंतु गावातील काही ठरावीक राजकीय व्यक्तींनी या सभागृहाला महात्मा फुले यांचे नाव टाकू नये यासाठी मुख्याधिकारी श्यामकुमार गोसावी यांच्यावर राजकीय दबाव आणला आह शिवाय उद्घाटनही न करण्यासंदर्भात पत्रकदेखील काढण्यास भाग पाडले. या सर्व प्रकरणामागे काही ठरावीक राजकीय लोकांचा हस्तक्षेप असल्याची चर्चा असल्याचा आरोप समाजबांधवांनी यावेळी केला. या सर्व प्रकाराचा जाब विचारण्यसाठी मंगळवारी सकाळी माळी समाज बांधवांचा मोर्चा नगरपरीषदेवर धडकला.


मुख्याधिकार्‍यांची शिष्टाई सफल
मुख्याधिकारी गोसावी यांच्याशी समाज बांधवानी आक्रमक पवित्रा घेऊन या प्रकारामागे कोण आहे? त्यांचे नावे समोर आणा असा जाब विचारला असता मुख्याधिकारी यांनी नाव नं सांगता, तुम्ही महात्मा फुले सामाजिक सभागृह, असे नाव राहू द्या आणि कार्यक्रम करा, असे सांगितल्यानंतर माळी समाजबांधव शांत होऊन या विषयावर पडदा पडला व नंतर समाज बांधव माघारी फिरले. महात्मा फुले यांच्या नावाला विरोध करणारे कोण? याबाबत शहरात दिवसभर नागरीकांमध्ये चर्चा रंगताना दिसून आली.

यांची होती उपस्थिती
या मोर्चात माळी समाजाध्यक्ष संजीव माळी, माळी समाज पंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संतोष माळी, भाजपचे शहाराध्यक्ष सुनील माळी, पंच रामदास माळी, माळी महासंघाचे शहराध्यक्ष सचिन माळी, तालुका उपाध्यक्ष विजय माळी, टिनू माळी, माळी युवा संघटनेचे अध्यक्ष दीपक माळी, उपाध्यक्ष बाळा माळी, पिंटू माळी, कृष्णा माळी, शक्ती माळी, विकास माळी, चेतन माळी, निखील माळी, दीपक माळी, अनिकेत माळी, लखन माळी, निखील माळी, पवन माळी, गंभीर माळी, दिपक माळी, ईश्वर माळी, कुणाल माळी, गणेश माळी, संकेत माळी, तेजस माळी, किरण माळी, पंकज माळी, प्रकाश माळी, चेतन माळी, विशाल माळी, अक्षय माळी, पवन माळी आदी समाज बांधव यांच्यासह शशिकांत चौधरी, गोलू मराठे उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !