मुंबई हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट राजधानी विशेष गाडी ही आता दररोज धावणार


भुसावळ : रेल्वे प्रशासनातर्फे रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई-हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट राजधानी एक्स्प्रेस दररोज चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी ही गाडी आठवड्यातून केवळ चार दिवस धावत होती मात्र आता ती दररोज धावणार असल्याने प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.डाऊन 01221 डाऊन मुंबई-हजरत निजामुद्दीन राजधानी सुपरफास्ट विशेष गाडी 19 जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत दररोज धावणार आहे तर अप 01222 हजरत निजामुद्दीन-मुंबई राजधानी सुपरफास्ट विशेष गाडी 20 जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत दररोज धावणार आहे. केवळ आरक्षिति तिकिट असलेल्या प्रवाश्यांनाच या विशेष गाड्यांमध्ये प्रवासाची परवानगी देण्यात येणार असून प्रवाशांना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !