रोटरी रेलसिटीतर्फे भव्य सायक्लोथॉनचे 17 रोजी आयोजन
भुसावळ : रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीतर्फे ‘स्वच्छ भुसावळ, प्रदूषणमुक्त भुसाव ’ या अभियानांतर्गत पर्यावरण पूरक सायकल रॅली (सायक्लोथॉनचे) आयोजन रविवार, 17 जानेवारी रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान (डी.एस.ग्राउंड) येथे करण्यात आले आहे. 5, 10 आणि 20 किमी अशा अंतरांची ही रॅली असणार आहे.
पूर्व नोंदणी आवश्यक
सर्व सहभागी सायकलस्वारांना पूर्व नोंदणी आवश्यक असून प्रत्येक नोंदणीस एक टी शर्ट आणि अनेक भेटवस्तू असलेली गुडी बॅग मिळणार आहे .गुडी बॅग आणि टी शर्टच्या वितरणासाठी शनिवार, 16 जानेवारी रोजी प्रभाकर हॉल येथे दुपारी एक ते पाचदरम्यान ‘सायक्लोथॉन एक्स्पो’ आयोजित केला आहे. सायकल रॅली नंतर लकी ड्रॉ द्वारे सायकल आणि इतर अनेक भेटवस्तू देखील वितरीत केल्या जाणार आहेत तसेच सर्व सहभागी सायकलस्वारांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. सायक्लोथॉन रॅलीचे सदिच्छादूत जळगाव जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, भुसावळ रनर्सचे अध्यक्ष प्रवीण फालक, आणि प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ.सुजाता केळकर आहेत. यंदा ही रॅली अधिक भव्यदिव्य स्वरूपात प्रस्तुत करण्यात येत असून यास पोलिस प्रशासन, नगरपालिका आणि इतर स्वयंसेवी संस्थांचे पाठबळ लाभले आहे. प्रमुख पाहुणे म्हणून डी.आर.एम.विवेककुमार गुप्ता, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे व मुख्याधिकारी संदीप चिद्रवार उपस्थित राहणार आहेत. रॅलीत जास्तीत-जास्त भुसावळकरांनी नोंदणी करून पर्यावरण पूरक जीवनशैलीचा अंगीकार करावा, असे आवाहन रोटरी रेल सिटीचे अध्यक्ष संदीप जोशी, सचिव विशाल शाह, प्रोजेक्ट चेअरमन सन्मीत पोतदार, डॉ.मकरंद चांदवडकर आदींनी केले आहे.


