राष्ट्रमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंदांना अभिवादन
भुसावळ विभागात राष्ट्रपुरूषांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन : मान्यवरांनी सांगितला महिमा
भुसावळ : राष्ट्रमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त भुसावळ शहर व विभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ठिकठिकाणी राष्ट्र पुरूषांच्या प्रतिमा पूजनानंतर मान्यवरांनी कार्याला उजाळा दिला.
जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जगाची उद्धारी
वरणगाव : राष्ट्रमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांची जयंती मंगळवारी श्री छत्रपती शिवाजी महाराज शिवतीर्थावर साजरी झाली. ज्येष्ठ नागरीक एच.जे.नाईक व अनिल देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी एच.जे.नाईक म्हणाले की, राष्ट्रमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजीराजे महाराज जन्माला आले म्हणून आपण हिंदवी स्वराज्य निर्माण करता आले. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाची उद्धारी, असेही नाईक भाषणात म्हणाले. यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज शिवतीर्थ स्मारक समिती अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष सुनील काळे, हाजी अल्लाउद्दीन सेठ, शामराव धनगर, संजयकुमार जैन, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, भाऊलाल टिंटोरे, संतोष माळी, गजानन वंजारी, माळी समाज समाजाध्यक्ष संजय माळी, कृष्णा माळी, आकाश निमकर, मिलिंद भैसे, कमलाकर मराठे, शंकर पवार, अक्षय माळी, सुनील परदेशी, ज्ञानेश्वर माळी, रामदास माळी, खंडू माळी, गोविंदा माळी, महेश माळी, जय चांदणे, विशाल कुंभार यांच्यासह असंख्य नागरीक उपस्थित होते.

म्युनीसीपल हायस्कूल
भुसावळ : नगर परीषद संचलित म्युनीसीपल हायस्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम शाळेचे मुख्याध्यापक बी.वाय.सोनवणे यांनी प्रतिमा पूजन केले. एस.ए.फालक, आर.सी.गोसावी व सरला सावकारे यांनी थोर पुरूषांच्या कार्याची माहिती दिली. शाळेचे शिक्षक आणि शिक्षिका उपस्थित होते. सूत्रसंचालन नाना पाटील तर आभार एन.जी.बोराडे यांनी मानले.
के.नारखेडे विद्यालयात राष्ट्रीय युवा दिन
भुसावळ : के.नारखेडे विद्यालयात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त स्वामी विवेकानंद यांची जयंती तसेच राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.बी.किरंगे यांनी प्रतिमा पूजन केले. उपमुख्याध्यापक रमण भोळे, ज्येष्ठ पर्यवेक्षक वाय.एन.झोपे, पर्यवेक्षकएस. एल.राणे, एस.पी.पाठक, उपस्थित शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होत्या. याप्रसंगी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक एस.पी.पाठक यांनी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जीवन व कार्याविषयी माहिती दिली.
महाराणा प्रताप विद्यालय
भुसावळ : महाराणा प्रताप विद्यालयात राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शिंदे, पर्यवेक्षिका मोरे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमधून मानस वानखेडे, सौरभ वाणी, कन्हैया तिवारी यांनी तर शिक्षकांमधून प्रदीप साखरे व कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन कुलकर्णी यांनी केले.

