स्वामी नारायण मंदिर सावदातर्फे संक्रांतीनिमित्त शहरातून झोळी फेरी


सावदा : शहरातून गुरुवारी येथील स्वामीनारायण मंदिरतर्फे झोळी (भिक्षा) फेरी काढण्यात आली. मकरसंक्रांतीस दानाचे मोठे महत्व असून यादिवशी हरीभक्ताचे हातून दान व्हावे म्हणून सदर झोळी फेरी दरवर्षी काढण्यात येत असते. सालाबादाप्रमाणे यंदादेखील सावदा मंदिराचे कोठारी स्वामी वासुदेवचरणदासजी यांच्या प्रेरणेने ही फेरी काढण्यात आली.

यांचा झोळी फेरीत सहभाग
झोळी फेरीत पाटील ुरा, इंदिरा गांधी चौक, संभाजी चौक, भोई वाडा, बुधवारा पेठ, गांधी चौक, गवत बाजार, शिवाजी चौक आदी प्रमुख मार्गावरुन काढण्यात आली. यावेळी यात स्वामी धर्मप्रसाददासजी, स्वामी तरुणप्रसाददासजी, स्वामी हरीप्रसाददाजसी, हरीभक्त शिवजी भारंबे, मेघ:शाम धांडे, प्रकाश भोळे, निलेश खाचणे, चेतन वारके, ईशान पाटील आदी हरीभक्तांनी सहभाग घेऊन नागरीकांचे घरोघरी जाऊन ही झोळी फिरविली.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !