कोईम्बतूर-जबलपूरसह कानपूरसाठी विशेष गाड्या धावणार
भुसावळ : रेल्वे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कोईम्बतूर-जबलपूरसह कानपूरसाठी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
जबलपूर-कोईम्बतूर उत्सव विशेष गाडी
अप 02198 जबलपूर-कोईम्बतूर उत्सव विशेष गाडी 16 जानेवारी ते 27 मार्च दरम्यान दर शनिवारी सुटणार आहे. या गाडीला खंडवा, भुसावळ, नाशिक रोड स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. डाऊन 02197 कोईम्बतूर-जबलपूर उत्सव विशेष गाडी 18 जानेवारी ते 29 मार्चदरम्यान दर सोमवारी सुटणार आहे. या गाडीला नाशिक, भुसावळ, खंडवा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

कानपूर-एलटीटी एक्स्प्रेस
अप 04151 कानपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस उत्सव विशेष गाडी 5 फेब्रुवारी ते 26 मार्चदरम्यान दर शुक्रवारी सुटणार आहे. या गाडीला भुसावळ रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. डाऊन 04152 लोकमान्य टिळक टर्मिनस-कानपूर उत्सव विशेष गाडी 6 ते 27 फेब्रुवारीदरम्यान दर शनिवारी सुटणार आहे. या गाडीला भुसावळ रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. केवळ आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची/प्रवास करण्याची परवानगी देण्यात येणार असून कोरोना नियमांचे पालन प्रवाशांना करावे लागणार आहे.


