निंभोर्यात युवकाची आत्महत्या
भुसावळ : तालुक्यातील निंभोरा येथील रहिवासी प्रशांत बाबुलाल सपकाळे (28) या युवकाने मानसिक आजाराला कंटाळून नैराश्येतून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी 4.30 वाजेपूर्वी घडली. प्रशांत हा गेल्या महिन्यापासून मानसिक संतूलन बिघडल्याने घरात बडबड करीत असल्याने त्यााच्यावर उपचार सुरू होते. मानसिक आजाराला कंटाळून, नैराश्येतून त्याने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात सचिन तायडे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शामकांत मोरे पुढील तपास करीत आहे.


