साकळी-दहिगाव जिल्हा परीषद गटात पाणीपुरवठा योजनेला मंजुरी
शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र सूर्यभान पाटील यांच्या प्रयत्नांना यश
यावल : साकळी-दहिगाव जिल्हा परीषद गटात जिल्हा परीषदेच्या माध्यमातून शिक्षण क्रीडा व आरोग्य सभापती रवींद्र सूर्यभान पाटील यांच्या अथक प्रयत्नांनी गटात दोन कोटी 52 लाख रुपयांच्या जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली आहे. यात दहिगाव 50 लक्ष, साकळी 50 लक्ष, कोरपावली 50 लक्ष, पिळोदा खुर्द 25 लक्ष, शिरागड 15 लक्ष, शिरसाड 45 लक्ष, थोरगव्हाण 25, लक्ष मनवेल 42 लक्ष असे मिळून दोन कोटी 52 लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना प्रथमच साकळी-दहिगाव गटांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात मंजूर झाली आहे. यामुळे या गावातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे. सभापती रवींद्र पाटील यांनी गटामध्ये चार वर्षात अनेक विकासकामे केली असून यात या सर्वात मोठ्या पाणीपुरवठा योजनेची भर पडणार आहे. यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र पाटील यांनी सांगितले की, गटाचा विकासासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्नशील आहे. गटाचा विकास व्हावा हेच माझे ध्येय असल्याने सबका साथ सबका विकास हे ब्रीदवाक्य घेऊनच मी गटाचा विकास करीत आहे.
