भुसावळात कोम्बिंगमध्ये गवसला हद्दपार आरोपी


लोखंडी तलवारही केली जप्त : हिस्ट्रीशीटरसह वॉण्टेड आरोपींचा शोध

भुसावळ : पोलिस दप्तरी दाखल असलेल्या गुन्ह्यातील पसार संशयीतांसह हद्दपार व हिस्ट्रीशीटर आरोपींसाठी शनिवारी मध्यरात्री शहर व बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वात कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. कोम्बिंगमध्ये दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केल्यानंतर आदेशाचे उल्लंघण करीत शहरात वावरणार्‍या आरोपीच्या बाजारपेठ पोलिसांनी मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपीच्या ताब्यातून लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. 23 रोजी रात्री अडीच वाजता दीनदयाल नगर भागात पोलिसांनी ही कारवाई केली. कलीम शेख सलीम (28, दीनदयाल नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. ईश्‍वर संजय भालेराव यांच्या फिर्यादीनुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हेगारी वर्तुळात उडाली खळबळ
पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वात बाजारपेठ हद्दीत शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्यासह दोन सहाय्यक निरीक्षकांसह 15 कर्मचार्‍यांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवले. पोलिसांच्या रेर्काडवरील हिस्ट्रीशीटर यांच्या घरांची तपासणी करण्यात आली तसेच पोलिसांना वॉण्टेड असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेण्यात आला त्याच पद्धत्तीने शहर हद्दीतही कारवाई करण्यात आली.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !