अमळनेर तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत तिघांचा मृत्यू


अमळनेर (मंगळवार, 1 ऑगट 2026) : अमळनेर तालुक्यात तीन दिवसात दोघांनी गळफास घेऊन तर एकाने विष प्राशन करून आत्महत्या केली. अमळनेर तालुक्यातील धार येथील पंडित राघो पाटील (76) यांनी 30 रोजी दुपारी 12.30 वाजता स्वतःच्या राहत्या घरी झोक्याच्या दोरीने गळफास घेतला. सुखदेव पंडित पाटील यांनी मारवड पोलिसात खबर दिली. तपास हेड कॉन्स्टेबल शरीफ पठाण करीत आहेत. शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथील मूळचे रहिवासी व हल्ली अमळनेर तालुक्यातील खर्दे येथील सतीलाल राजधर भील (30) याने फुलसिंग पोपट भील याच्या बंद पडलेल्या घरात लोखंडी ग्रीलला साडी बांधून गळफास घेतला. हा प्रकार 29 रोजी सकाळी 7.45 वाजता समोर आला. मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार सुनील पाटील करीत आहेत.

तिसर्‍या घटनेत अमळनेर तालुक्यातील एकतास येथील अंकित विश्राम पाटील याने 28 रोजी विष प्राशन केल्याने त्याला नर्मदा फाउंडेशनमध्ये दाखल करण्यात आले मात्र प्रकृती खालावल्यामुळे त्याला 29 रोजी ग्रामीण रुग्णालयात आणले असता त्याचा मृत्यू ओढावला. मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !