भविष्यातील ध्येय निश्चित करा भुसावळात प्राचार्य आर.पी.फालक

दादासाहेब भोळे महाविद्यालयात युवती सभेचे उद्घाटन


भुसावळ (मंगळवार, 1 ऑगट 2026) : सोशल मीडियाचा योग्य, मर्यादित आणि जबाबदारीने वापर करण्याची आज गरज आहे मात्र तरुणाईच्या हाती आलेल्या मोबाईलमुळे तरुण पिढी वाचन ध्येयापासून दुरावत चालली आहे. आपले इच्छित ध्येय गाठल्यासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन अभ्यासोबतच व्यक्तिमत्त्व विकास, कौशल्यविकास आणि आत्मविश्वास वृद्धिंगत करण्यावर भर देऊन भविष्यातील ध्येय निश्चित करावे, असे आवाहन प्राचार्य राजू फालक यांनी येथे केले.

शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोंळे महाविद्यालयात विद्यार्थी विकास समितीअंतर्गत युवती सभेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
विचार मंचावर विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.संजय चौधरी तसेच युवती सभा प्रमुख प्रा.संगीता धर्माधिकारी उपस्थित होत्या.


उपक्रमांमध्ये विद्यार्थिनींनी सहभागी व्हावे
प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी विद्यार्थिनींना शारीरिक व मानसिक आरोग्याचे महत्त्व विषद केले. आजच्या स्पर्धात्मक आणि धकाधकीच्या जीवनात ताण-तणावाचे योग्य व्यवस्थापन, संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी विश्रांती आणि सकारात्मक विचारसरणी यांचा मानसिक व शारीरिक स्वास्थ्यावर होणारा परिणाम त्यांनी स्पष्ट केला. महाविद्यालयात युवतींसाठी आयोजित करण्यात येणार्‍या विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

यांची होती उपस्थिती
प्रास्ताविक युवती सभा सचिव प्रा.संगीता धर्माधिकारी यांनी केले. डॉ. अंजली पाटील, प्रा.एस.डी.चौधरी, प्रा.निर्मला एस.वानखेडे, प्रा.ए.आर. सावळे, प्रा.गायत्री नेमाडे, प्रा.सविता जंगले, प्रा.सागर सोनवणे, प्रा.अजय साळुंके, प्रा.सुशीला बाटे, प्रा.चेतन पारखे, प्रा.राजश्री ठोंबरे, प्रा.कामिनी चौधरी, प्रा.रोहिणी भारंबे, प्रा.स्मिता पाटील, प्रा.रंजना ढाके यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा.डॉ.माधुरी पाटील तर आभार प्रा.डॉ.जे.पी.सरोदे यांनी मानले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !