भुसावळातील पु.ओं.नाहाटा महाविद्यालयात रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट समितीतर्फे लिटरेचर रिव्ह्यूवर व्याख्यान
भुसावळ (मंगळवार, 1 ऑगट 2026) : शहरातील पु.ओं.नाहाटा महाविद्यालयात रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट समितीतर्फे लिटरेचर रिव्ह्यू अॅण्ड प्रोजेक्ट रायटिंग या विषयावर मंगळवार, 1 सप्टेंबर 2026 रोजी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.डी. एन.पाटील होते.
यांची होती उपस्थिती
यावेळी उपप्राचार्य डॉ.जी.आर.वाणी यांची उपस्थिती होती. प्रमुख वक्ते म्हणून डॉ.व्ही.एन.महिरे तर समिती प्रमुख डॉ.एस.डी.येवले व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ.महिरे यांनी आपल्या व्याख्यानामध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार लागू असलेला प्रोजेक्ट करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी प्रोजेक्टवर काम करताना, टॉपिक कसा निवडावा, सविस्तर आणि अधिक सखोल लिटरेचर रिव्ह्यू कसा करावा याबाबत माहिती दिली. त्यांनी लिटरेचर रिव्ह्यू करताना कोण-कोणते टूल इंटरनेट युगात उपलब्धतेबद्दल सविस्तर माहिती दिली.

70 शिक्षकांसह विद्यार्थ्यांचा सहभाग
डॉ.डी.एन.पाटील यांनी नवीन शैक्षणिक धोरणानुसार लागू झालेल्या प्रोजेक्टचे महत्व विषद केले. एकूण 70 विद्यार्थी आणि शिक्षक यांनी सहभाग नोंदवला. प्रास्ताविक समितीप्रमुख डॉ.एस.डी.येवले यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ.एम.जे.जाधव यांनी केले. यशस्वीतेसाठी डॉ.ए.जे. हिवाळे, डॉ.के.ए.वारके, डॉ.रश्मी शर्मा, डॉ.ए.डी.क्षिरसागर आणि रस्सायनशास्त्र विभागातील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.


