चोपडा-यावल रस्त्यावर खड्ड्यांचा त्रास वाढला
यावल : चोपडा-यावल या राज्य मार्गावरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहे. अशा अवस्थेमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यावलच्या निद्रावस्थेत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ हे रस्त्यावरील खड्डे दुरूस्त न केल्यास भाजपाच्यावतीने खड्डयांमध्ये वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचे एका लेखी निवेदनाद्वारे सांगण्यात आले आहे. दरम्यान, भाजपातर्फे यावल येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अधिकारी जे.एस. तडवी यांना नुकतेच तक्रार निवेदन देण्यात आले.
यांच्या निवेदनावर स्वाक्षर्या
यावल शहरातून जाणार्या चोपडा ते यावल या मार्गावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहे. या खुड्यांमुळे वाहतुकीची फार मोठी डोकेदुखी झाली आहे. वाहनाच्या दबावामुळे टायराखाली येणारे दगड उडुन अनेकांना दुखापतींना सामोरे जावे लागत आहे. परिणामी यामुळे अनेकवेळा वाहनधारकांसह पादचार्यांमध्ये वादविवाद होत असतात. यावल शहरातील प्रमुख बुरूज चौकातही मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. ते आणि इतर मार्गाची प्रजासत्ताक दिनाच्यापूर्वी दुरूस्ती न झाल्यास भाजपावतीने 26 जानेवारीला या खड्डयामंध्ये वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर भाजपाचे तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, शहराध्यक्ष डॉ. निलेश गडे, योगेश चौधरी, रितेश बारी, परेश बारी आदींच्या स्वाक्षर्या आहेत.



