एलटीटी-प्रतापगढ मार्गावर दोन विशेष रेल्वे धावणार


भुसावळ : रेल्वे गाड्यांमधील गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने एलटीटी- प्रतापगढ मार्गावर अप व डाऊन अशा दोन विशेष गाड्या 31 जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. डाऊन 01073 एलटीटी-प्रतापगड विशेष गाडी रविवार, 31 जानेवारपासून मंगळवार, रविवारी दुपारी 4.25 वाजता सुटणार आहे. दुसर्‍या दिवशी प्रतापगड सायंकाळी प्रतापगडला पोहोचेल. डाऊन मार्गावर नाशिकला सायंकाळी 7.30, भुसावळला रात्री 11.20 वाजता पोहोचेल. त्यासोबत भोपाळ, झाशी, ओरोइ, कानपूर, लखनऊ रायबरेली, अमेठी येथे थांबा आहे. अप 01074 मार्गावरील गाडी 2 फेब्रुवारीपासून गुरुवारी व मंगळवारी प्रतापगडहून रात्री 1.50 वाजता सुटेल. दुसर्‍या दिवशी एलटीटीला 5.30 वाजता पोहोचेल. अप मार्गावर ही गाडी भुसावळला रात्री 22.40, नाशिकला 2.05 वाजता पोहोचेल. या गाड्यांचे आरक्षण 24 जानेवारीपासून सुरू झाले असून प्रवाशांनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !