कंडारीतील युवतीची गळफास घेऊन आत्महत्या
भुसावळ : शहरालगतच्या कंडारी येथे अंजली किसन वाघमारे (30) या युवतीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. नागसेन कॉलनीतील रहिवासी अंजली किसन वाघमारे या युवतीने रविवारी दुपारी चार वाजता आत्महत्या केली. सहा.पोलिस निरीक्षक विनोदकुमार गोसावी, हवालदार नागेंद्र तायडे, विकास बाविस्कर यांनी घटनास्थळी पंचनामा केला. युवतीचा मृतदेह पालिका रुग्णालयात विच्छेदनासाठी हलवण्यात आला.


