राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
भुसावळात मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांचा उत्कृष्ट कार्यामुळे सन्मान : शाळांमध्ये नवमतदारांना कार्डाचे वाटप
भुसावळ : राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून भुसावळ शहरासह विभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भुसावळात उत्कृष्ट कार्य करणार्या मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला तर ठिकठिकाणी नवीन मतदारांना मतदान कार्डाचे वाटप करण्यात आले.
भुसावळात केंद्रस्तरीय अधिकार्यांचा सन्मान
भुसावळ : उत्कृष्ट कार्याची दखल घेत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या स्वाक्षरीचे फोटो फ्रेम प्रमाणपत्र देवून तहसीलदार दीपक धीवरे यांनी सुधीर रामदास तायडे व निलेश पाटील यांचा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून गौरव केला. याप्रसंगी काही नवमतदारांचे मतदान कार्ड व पुष्प देवून लोकशाहीच्या प्रवाहात स्वागत करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार घुले मडम व नायब तहसीलदार इंगळे उपस्थित होते. युवाशक्ती आपल्या देशाचे भवितव्य असून त्यांना वयाचे 18 वर्ष पूर्ण होताच मतदानाचा आधिकार मिळवून दिला गेला पाहिजे. लोकशाही सशक्तीकरणासाठी युवकांमध्ये जनजागृती करणे महत्वाचे आहे. यासाठी मतदान केंद्रस्तरिय अधिकार्यांची भूमिका अत्यंत महत्वाची असून प्रत्येक जण आपले कार्य चांगल्या पध्दतीने करण्याचा प्रयत्न करत असतो, असे विचार तहसीलदार धीवरे यांनी व्यक्त केले. निवडणूक विभागाकडून माझा करण्यात आलेला गौरव हा माझा वैयक्तिक गौरव नसून आपल्या सर्वांच्या वतीने प्रतिनिधीक स्वरुपात आपल्या सर्वांच्या सांघिक कार्याचाच हा गौरव असल्याचे सुधीर तायडे म्हणाले.
कार्यक्रमाला योगेश मुस्कवाड, अमोल पाटील, सचिन पाटील यांच्यासह महसूलचे कर्मचारी व नवमतदार उपस्थित होते. सूत्रसंचालन भगवान शिरसाठ यांनी केले.


के.नारखेडे विद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन
भुसावळ : के.नारखेडे विद्यालयात सोमवारी सकाळी दहा वाजता राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक एन.बी.किरंगे अध्यक्षस्थानी होते. रमण भोळे, ज्येष्ठ पर्यवेक्षक वाय.एन.झोपे, पर्यवेक्षक, बीएलओ एस.एल.राणे, मनोज कुलकण, मनोज तडवी, एच.एल.जंगले, बीएलओ धांडे उपस्थित होते. यावेळी नवमतदारांना मतदान कार्डाचे वाटप करण्यात आले. एस.पी.पाठक यांनी राष्ट्रीय मतदार दिनाचे महत्त्व विषद केले.
दादासाहेब दे.ना.भोळे महाविद्यालय
भुसावळ : दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.आर.पी.फालक होते. मतदानाचे महत्व आणि सशक्त लोकशाहीचे फायदे यांचे महत्व त्यांनी स्पष्ट केले. शपथ पत्राचे वाचन डॉ.दयाघन राणे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.जी.पी.वाघूळदे यांनी केले. प्रसंगी रा.से.यो.अधिकारी डॉ.जी.पी.वाघूळदे, प्रा.डॉ.डी.एस.राणे, प्रा.निर्मला वानखेडे, एरीया कोआर्डीनेटोर प्रा.ए.आर.सावळे, डॉ.आर.बी.ढाके, डॉ.संजय चौधरी, प्रा.एस.डी. चौधरी, प्रा.आर.डी. भोळे, प्रा.एस.एस.पाटील, प्रा.अनिल नेमाडे, डॉ.जे.पी.सरोदे, डॉ.शोभा चौधरी, प्रा.अंजली पाटील, प्रा.माधुरी पाटील, प्रा.संगीता धर्माधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. आभार प्रा.डॉ.डी.एस.राणे यांनी मानल्याचे प्रसिद्धी प्रमुख प्रा.डॉ.संजय चौधरी कळवतात.


