प्रवाशांना दिलासा : आठ विशेष उत्सव गाड्यांना मुदतवाढ
भुसावळ : रेल्वे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आठ विशेष उत्सव गाड्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
या गाड्यांना मिळाली मुदतवाढ
डाऊन 06502 यशवंतपूर-अहमदाबाद (दर रविवार) विशेष गाडीला 31 जानेवारी ते 28 मार्चदरम्यान मुदतवाढ देण्यात आली. अप 06501 अहमदाबाद-यशवंतपूर (दर मंगळवार) 2 फेब्रुवारी ते 30 मार्चदरम्यान मुदतवाढ देण्यात आली आहे. डाऊन 02741 वास्को दि गामा पटना (दर बुधवार) या गाडीला 27 जानेवारी ते 31 मार्च दरम्यान मुदतवाढ देण्यात आली. अप 02742 पटना वास्को दि गामा या गाडीला 30 जानेवारी ते 3 एप्रिलदरम्यान मुदतवाढ देण्यात आली. डाऊन 07323 हुबली वाराणसी (दर शुक्रवार) या गाडीला 29 जानेवाी ते 26 मार्चदरम्यान मुदतवाढ देण्यात आली आहे. अप 07324 वाराणसी हुबळी (दर रविवार) या गाडीला 30 जानेवारी ते 28 मार्चदरम्यान मुदतवाढ देण्यात आली आहे. डाऊन 06229 म्हैसूर वाराणसी (दर मंगळवार व गुरुवार) या गाडीला 28 जानेवारी ते 30 मार्चदरम्यान मुदतवाढ देण्यात आली आहे. अप 06230 वाराणसी म्हैसूर (दर गुरुवारी व शनिवारी) या गाडीला 30 जानेवारी ते 1 एप्रिलदरम्यान मुदतवाढ देण्यात आली आहे.



