दहिगावात सीआरपीएफ जवानाचे जंगी स्वागत


यावल : गेल्या 20 वर्षांपासून सीआरपीएफ पदावर नोकरी करून सेवा समाप्तीनंतर दहिगाव या मूळ गावी परतलेल्या जवानाचे ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत करीत सत्कार केला. दहिगाव येथील आंबेडकर नगरातील राजेंद्र काशिनाथ जगताप यांनी 31 जानेवारी 2021 रोजी सीआरपीएफमध्ये 20 वर्ष नऊ महिन्यांचा सेवा काळ पूर्ण केल्यानंतर नुकतेच ते गावी परतले. 20 वर्षांच्या कालावधीत नागपूर, जम्मू काश्मीर, पंजाब, चंदिगड, आसाम तेजपूर, अरुणाचल प्रदेश, आसाम, नवगाव येथे सेवा बजावली आहे. जवानाचे दहिगावात आगमन झाल्यानंतर ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत करीत त्यांची मिरवणूक काढली. या मिरवणुकीत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी किशोर मधुकर महाजन, देविदास पाटील, पुंडलिक पाटील, अजय बाळू अडकमोल व ग्रामस्थ सहभागी झाले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !