अजय भारंबे विरुद्धच्या तक्रारीची जिल्हाधिकार्‍यांकडे 5 रोजी सुनावणी


सावदा : नगरसेवक अजय भारंबे यांनी पदाचा गैरवापर केल्याने त्यांचे पद रद्द करण्यात यावे, अशा आशयाची तक्रार विरोधी गटाच्या नगरसेवकांनी केलेल्या तक्रारीची जिल्हाधिकारी यांच्याकडे 5 फेब्रुवारी रोजी सुनावणी करण्यात येणार आहे. नगरसेवक अजय भारंबे यांचे वडील भागवत भारंबे यांनी आपल्या मालकीच्या जागेवर भू अभिन्यास मंजूर करताना शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर मी या भू अभिन्यासमध्ये गटारीचे बांधकाम करून देईल, असे लिहून दिले आहे. सदरील भू अभिन्यासा वरील वसुली रक्कम सदर मालकाने पालिकेत भरावी अशी नोटीस पालिकेने त्यांना बजावली आहे.सदरील भू अभिन्यासचे मालक भागवत भारंबे यांचे नगरसेवक अजय भारंबे हे पुत्र आहेत आणि ते सत्ताधारी गटातील गटनेते आहेत. भारंबे यांनी आजपावेतो पालिकेची थकबाकी भरलेली नाही, अशी विरोधी ही तक्रार आहे. या मिळकतीवर नगरपरीषदेचे नाव लावण्याबाबतचा आदेश मुख्याधिकारी यांनी कर अधीक्षकांना दिलेला आहे. अजय भारंबे यांनी पदाचा दुरुपयोग केलेला आहे त्यामुळे त्यांना नगरपालिका अधिनियम कायद्यानुसार अपात्र करण्यात यावे, अशी तक्रार विरोधी नगरसेवक राजेंद्र चौधरी, राजेश वानखेडे, फिरोज खान पठाण, सिद्धार्थ बडगे यांनी केली आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !