दहा उत्सव विशेष गाड्यांना एप्रिलपर्यंत मुदतवाढ


भुसावळ : रेल्वे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी दहा विशेष उत्सव गाड्यांना एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आला आहे.

या गाड्यांना मिळाली मुदतवाढ
डाऊन 02905 ओखा-हावडा एक्स्प्रेसला 7 फेब्रुवारी ते 25 एप्रिलपर्यंत, अप 02906 अप हावडा-ओखा एक्स्प्रेसला 9 फेब्रुवारी ते 27 एप्रिलपर्यंत, डाऊन 09205 पोरबंदर-हावडा एक्स्प्रेसला 3 फेब्रुवारी ते 29 एप्रिलपर्यंत,
अप 09206 हावडा-पोरबंदर एक्स्प्रेसला 5 फेब्रुवारी ते 1 मे पर्यंत, डाऊन 09057 उधना-मंडुआडी एक्स्प्रेसला 5 फेब्रुवारी ते 30 एप्रिलपर्यंत, अप 09058 मंडुआडीह-उधना एक्स्प्रेसला 7 फेब्रुवारी ते 2 मे पर्यंत, डाऊन 09271 बांद्रा टर्मिनस-पटना एक्स्प्रेसला 1 फेब्रुवारी ते 26 एप्रिलपर्यंत, 09272 पटना-बांद्रा टर्मिनस एक्स्प्रेसला 3 फेब्रुवारी ते 28 एप्रिलपर्यंत, डाऊन 02913 बांद्रा टर्मिनस-सहरसा एक्स्प्रेसला 7 फेब्रुवारी ते 25 एप्रिलपर्यंत, अप 02914 सहरसा-बांद्रा टर्मिनसला 9 फेब्रुवारी ते 27 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. केवळ आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाश्यांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल शिवाय प्रवाशांना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !