रावेरातील खुनाचा उलगडा : चौघे संशयीत पोलिसांच्या ताब्यात


रावेर : बर्‍हाणपूर-अंकलेश्‍वर महामार्गाला लागून एका प्लॉटिंग टाकलेल्या ठिकाणी एका युवकाचा खून करून मृतदेह टाकून देण्यात आल्याची घटना बुधवारी उघडकीस आली होती. पोलिसांनी तपासचक्रे गतिमान केल्यानंतर मयताचे नाव सौरभ गणेश राऊत (देवराई, जि.बीड) असल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणी चौघा आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी दिली. महेश विश्‍वनाथ महाजन, विकास गोपाल महाजन, विनोद विठ्ठल सातव, भैय्या दुबी (पूर्ण नाव माहित नाही, सर्व रा.रावेर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींनी राऊत याला मारहाण करून त्याचा रूमालाने गळा आवळल्याची कबुली पोलिस तपासात दिली आहे.

यांची होती उपस्थिती
यावेळी अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी डीवायएसपी राजेंद्र रायसिंग, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, सहा.पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक, पोलिस उपनिरीक्षक मनोज वाघमारे आदी उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !