बोदवडला भाजपातर्फे वीज कंपनीच्या कार्यालयाला टाळे


बोदवड : लॉकडाउन काळामध्ये वाढीव वीजबीले देऊन ग्राहकांच्या खिशावर दरोडा टाकून कोट्यवधी रुपयांची लूट करणार्‍या आघाडी सरकारने वीज बिल माफ करण्याचे आश्वासन देऊनही आता सक्तीची वसुली सुरू केल्याच्या विरोधात तसेच चार कोटी जनतेला अंधारात ठेवण्याचे महापाप करत असल्याच्या निषेधार्थ भाजपाच्या वतीने शुक्रवारी वीज वितरण कंपनीच्या भुसावळ रस्त्यावरील कार्यालयावर हल्लाबोल करून कार्यलयाला टाळा ठोको आंदोलन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटील, शहराध्यक्ष नरेश आहुज, शहर सरचिटणीस अमोल शिरपुरकर, जिल्हा सरचिटणीस अनिता अग्रवाल, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विक्रम वरकड, संजय बडगुजर, गणेश शर्मा, दिलीप घुले, संजय अग्रवाल, उमेश गुरव, धनराज सुतार, बालू शर्मा, सागर गंगतीरे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !