यावलमध्ये राज्य शासनाविरोधात घोषणाबाजी : वीज कंपनी कार्यालयाला टाळे


यावल : वीज ग्राहकांवर कारवाई करण्यास आदेश देणार्‍या राज्य सरकार विरोधात यावल शहर व तालुका भाजपाकडून शुक्रवारी सकाळी 11 वाजता चोपडा रस्त्यावरील विद्युत वितरण कार्यालयाला टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

आंदोलनात यांचा सहभाग
या आंदोलनात तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष हर्षल पाटील, किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष नारायण चौधरी, जिल्हा बँक संचालक गणेश नेहेते, भाजपा तालुका सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस राकेश फेगडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सागर कोळी, यावल शहराध्यक्ष निलेश गडे, फैजपूर शहराध्यक्ष अनंत नेहेते, नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे, पंचायत समिती उप सभापती दीपक पाटील, माजी नगराध्यक्ष फैजपूर निलेश राणे, बाजार समिती उपसभापती उमेश पाटील, अनुसूचित जाती जिल्हा उपाध्यक्ष बबलु घारू, युवा मोर्चा शहराध्यक्ष रीतेश बारी, हेमराज फेगडे, माजी तालुकाध्यक्ष डॉ.नरेंद्र कोल्हे, गोपालसिंग पाटील, किशोर कुलकर्णी, लहू पाटील, अतुल भालेराव, किशोर चौधरी, रामा होले, योगेश चौधरी, हेमंत चौधरी, ललित चौधरी, स्नेहल फिरके, मनोज बारी, भूषण फेगडे, राहुल फेगडे सह शहर व तालुका भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी विद्युत वितरणचे सहाय्यक अभियंता ए. बी. दमाडे, पोलिस निरीक्षक सुधीर पाटील पथकासह उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !