भुसावळात स्व.बी.सी.बियाणी यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन


भुसावळ : बियाणी ग्रुपचे संस्थापक, अध्यक्ष बी.सी.बियाणी (मामाजी) यांना 2 फेब्रुवारी रोजी सातव्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी बियाणी परीवारातील सदस्य व स्नेही परीवार तसेच बियाणी ग्रुपच्या विविध शाळांचे प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्वप्रथम बियाणी मिलिटरी स्कूलमधील त्यांच्या पुतळ्यास त्यांच्या पत्नी कांताबाई बियाणी यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर त्यांचे पुत्र मनोज बियाणी, सून संगीता बियाणी, पूत्र विनोद बियाणी, सून स्मिता बियाणी तसेच त्यांची नातवंडे रोनक बियाणी, मुस्कान बियाणी, पियुष बियाणी, खुशी बियाणी यांनी पुष्पहार अर्पण केला.

यांची होती उपस्थिती
मामा बियाणी यांनी मिलिटरी स्कूलचीदेखील स्थापना केल्याने बियाणी मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मामाजींच्या पुतळ्यासमोर मानवंदना दिली यावेळी भुसावळ शहराचे नगराध्यक्ष रमण भोळे, नगरसेवक प्रा.सुनील नेवे, प्रमोद सावकारे, किरण कोलते, पिंटू कोठारी, दीपक धांडे, दिनेश जोगदंड, प्रशांत निकम, पप्पू बारसे, बापू महाजन, दिनेश नेमाडे, देवा वाणी, प्राचार्य मनोज दर्गड, आर.पी.सिंग, आर.आर.साहनी, शुक्ला सर, डी.एम.पाटील, कांचन जोशी, रुद्रसेन गठीया, राजू पारीख, प्रवीण भराडीया उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !