हातगाडीवर दुचाकी ठेवत भुसावळात सेनेतर्फे इंधन दरवाढीचा निषेध


भुसावळ : केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात पेट्रोल व डिझेलवर कृषी अधिभार लावण्याने पेट्रोलचे दर शंभरीकडे आगेकूच करीत असल्याच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे इंधन दरवाडीच्या निषेधार्थ दुचाकी लोटगाडीवर ठेवून मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. केंद्र सरकारने वेगवेगळे कर कमी करून इंधनाचे भाव कमी करावेत आणि जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा याहून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात तहसील प्रशासनाला निवेदनाद्वारे देण्यात आला.

दुचाकीची हातगाडीवरून मिरवणूक
इंधनाचे दर आभाळाला भिडले असून इंधन परवडत नसल्याचा निषेध करण्यासाठी काही कार्यकर्त्यांनी दुचाकी हातगाड्यांवरून ठेवून त्या ढकलत आणल्या तर काहींनी दुचाकीदेखील ढकलत आणल्या. केंद्राने इंधन दरवाढ अशीच सुरु ठेवली, तर यापुढे जनतेला प्रवासासाठी हेच मार्ग वापरावे लागतील, असा संदेशही यातून देण्यात आला.


सामान्य जनतेची आर्थिक पिळवणूक
घरगुती गॅस अबकारी करात सातत्याने वाढ होत आहे.यामुळे जनता त्रस्त झाली आहे. पेट्रोल-डिझेलची दरवाढ होणार नाही असा शब्द केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवर कृषी उपकर लावल्यानंतर दिला होता पण शब्दाचा बुडबुडाच ठरला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारकडे बोट दाखवून स्वतःचा बचाव करीत आहे. सत्ताधार्‍यांची ही जुमलेबाजी देशाला नवीन नाही.तीन कृषी कायदयांच्या नावाने शेतकर्‍यांची अशीच जुमलेबाजी सुरू आहे.
केंद्र सरकारने केलेली पेट्रोल,डिझेल,घरगुती गॅस दरवाढ सामान्य जनतेची आर्थिक पिळवणूक करीत असल्याचा आरोप शिवसेनेतर्फे करण्यात आला आहे.

यांची होती उपस्थिती
भुसावळ तहसीलदार दीपक धिवरे यांना निवेदन देतांना उपजिल्हा प्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, उपजिल्हा संघटक विलास मुळे, उपजिल्हाप्रमुख अ‍ॅड.श्याम गोंदेकर, उपजिल्हाप्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, तालुकाप्रमुख समाधान महाजन, नियोजन समिती सदस्य अ‍ॅड.मनोहर खैरनार, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, शहरप्रमुख निलेश महाजन, शहर प्रमुख बबलू बर्‍हाटे, शहर संघटक जग्गु खेराडे, शहर संघटक योगेश बागुल उपस्थित होते. आंदोलनात
शिक्षण सभापती मुकेश गुंजाळ, पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, माजी नगरसेवक दीपक धांडे, उपतालुकाप्रमुख सुभाष चौधरी, उपजिल्हा युवाधिकारी प्रवीण पाटील, आबा पाटील, गोकुळ बाविस्कर, महिला आघाडीच्या भुराबाई चव्हाण, योगीता सोनार, भारती गोसावी, शिक्षकसेना जिल्हाप्रमुख प्राचार्य विनोद गायकवाड,ज्येेष्ठ शिवसैनिक गजानन निळे, शरद जोहरे, नमा शर्मा, उपशहरप्रमुख पवन नाले, स्वप्निल सावळे, गुणवंत पाटील, उपशहरसंघटक सोनी ठाकूर, नबी पटेल, ग्राहक संरक्षण कक्ष शहरप्रमुख मनोज पवार, अमोल भालेराव, नाना लोखंडे, चंदू चव्हाण, निलेश ठाकूर, राहुल सोनटक्के, किशोर कोळी, विनोद पाटील, अल्पसंख्यांक आघाडीचे शेख मेहमुद, मंगल शिरोडे, हाशीम तडवी, प्रदीप भुसारे, सुरेंद्र यादव, मोहसीन तडवी, खालीक बागवान व शिवसेनेच्या सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !