बोदवड महाविद्यालयात अलोक नियत कालिकाचे प्रकाशन
बोदवड : बोदवड महाविद्यालयात 1920-20 चे आलोक नियतकालिकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. दि बोदवड सार्व को.ऑप एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मिठूलालजी अग्रवाल यांच्याहस्ते आलोक नियतकालिकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी सचिव विकास कोटेचा, संचालक अशोक जैन, श्रीराम बडगुजर, कैलास खंडेलवाल, प्राचार्य डॉ.अरविंद चौधरी, उपप्राचार्य डी.एस.पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना चालना देणारा, विद्यार्थ्यांमधील लेखक, कवी जागा करणास उपयुक्त ठरणार्या आलोक नियतकालिकाचा सर्व लेखजोखा यावेळी संपादक मंडळाच्या प्रमुख डॉ.कामिनी तिवारी यांनी मांडला. प्रास्ताविक आलोक नियतकालिक प्रमुख डॉ.कामिनी तिवारी तर आभार डॉ.रत्ना जवरास यांनी मानले. यावेळी नुकतेच पीएचडीप्राप्त झाल्याबद्दल डॉ.अजय पाटील यांचा शाल, श्रीफळ आणि बुके देऊन संस्थेचे चेअरमन मिठूलालजी अग्रवाल यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.


