भरधाव डंपरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू


साळशिंगी-भानखेडा रस्त्यावर अपघात : अपघातानंतर डंपर चालक पसार : जमावाने फोडल्या डंपरच्या काचा

बोदवड : भरधाव डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाल. साळशिंगी-भानखेडा रस्त्यावरून शनिवारी सकाळी 11.30 वाजता हा अपघात झाला. अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रकच्या काचा फोडल्या. साळशिंगी-भानखेडा या रस्त्यावरून यावलकडे अविनाश वराडे हे आई रजनी वराडेसह दुचाकी (एम.एच.19 डी.के.5068) ने निघाले असता डंपर (एम.एच.19 सी.वाय.1466) ने जबर धडक दिल्याने रजनी देविदास वराडे (50, रा.साने गुरूजी शाळेजवळ, यावल) यांचा डंपरखाली आल्याने जागीच मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा अविनाश देवीदास वराडे (24) हा मुलगा गंभीर जखमी झाला. अपघातानंतर डंपर चालक पसार झाला तर पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला असून अज्ञात डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास बोदवड पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कालिचरण बर्‍हाटे करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !