दुचाकी अपघातात चौघे जखमी


यावल : यावल-चोपडा मार्गावरील रस्त्यावर फॉरेस्ट कार्यालयाजवळ शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास दोन दुचाकीत धडक होवून चौघे जखमी झाले. दोन गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जळगाव येथील सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. सावदा येथील रहिवासी संतोष किसन भोई (30) व भुसावळ येथील आशा विनोद भोई (25) दुचाकी (एम.एच19.डी.डी.5862) ने सावद्याहून तोरखेडा, ता.शहादा येथे बहिणीकडे जाण्यास निघाले असतांना यावल-चोपडा मार्गावर शहरापासुन सुमारे 1 किलोमिटर अंतरावरील फॉरेस्ट कार्यालयाच्या परिसरा जवळील रस्त्यावर चोपड्याहून यावलकडे येणार्‍या मोटर सायकलने समोरासमोर धडक दिल्याने संतोष भोई व आशा भोई यांच्यासह दुसर्‍या वाहनावरील दोघे जखमी झाले. जखमींना हलवण्यासाठी रीपाईचे कार्यकर्त विष्णु पारधे, यावल येथील भोई समाजाचे कार्यकर्त भिका भोई व अन्य सामाजीक कार्यकर्त्यांनी मदत केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !