पीटा अॅक्टमधील सूत्रधार महिलेस पोलिस कोठडी
भुसावळ : शहरातील वैतागवाडी परीसरात छापा टाकून पोलिसांनी रविवारी पाच महिलांसह, सहा आंबटशौकिनांना अटक केली होती. या प्रकरणातील सूत्रधार महिलेस न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. याप्रकरणी पीटा अॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील वैतागवाडी भागात अवैधरीत्या देहव्यापार होत असल्याची माहिती डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, सहा.अधीक्षक अर्चित चांडक यांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी परीसरात जात छापा टाकून सहा आंबटशौकिनांना पकडले होते. तर तीन पीडीत महिलांची रवानगी जळगाव येथे सुरक्षागृहात केली आहे. याप्रकरणी एक संशयीत युवक आणि एक महिला पसार झाली आहे.

