शिरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई : 82.50 लाखांचा 330 किलो गांजा जप्त
शिरपूर (रविवार, 30 ऑगस्ट 2026) : शिरपूर तालुका पोलिसांनी अतिदुर्गम चिलारे, पो.सुळे परिसरात वनविभागाच्या जमिनीवर फुलवलेल्या गांजावर शेतीवर कारवाई करीत तब्बल 82 लाख 50 हजार रुपये किंमतीचा 330 किलो गांजासदृश्य अंमली पदार्थ जप्त केला. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करून एकाला अटक करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली. या प्रकरणी शिलदार कालूसिंग पावरा (42) व दीपक अभिमान पावरा (42) यांच्याविरोधात शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला तर दीपक यास अटक करण्यात आली मात्र शिलदार पसार झाला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, पोलीस उपअधीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, उपनिरीक्षक मिलिंद पवार, उपनिरीक्षक मनोज कचरे, अंमलदार सागर ठाकूर, संतोष पाटील, संदीप ठाकरे, संजय चव्हाण, जगन्नाथ कोळी, मोहन पाटील, योगेश मोरे, विजय ढिवरे, संजय भोई, सुनील पवार, ग्यानसिंग पावरा, मुकेश पावरा, वाला पुरोहित, मनोज नेरकर, गिरधर पाटील, मनोज पाटील, इसरार फारूक आदींच्या पथकाने केली.
