पत्रकारास दमदाटी : निरीक्षकांवर कारवाईसाठी पोलिस अधीक्षकांना निवेदन
बोदवड : बोदवड पोलीस ठाण्यात पत्रकार गोपाळ व्यास यांना दमदाटी करणार्या पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे मागणी जळगाव जिल्हा पोलिस सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
निवेदन देताना जळगाव जिल्हा पत्रकार संघाचे दीपक सपकाळे, सुकलाल सुरवाडे, सुनील भोळे, नाना पाटील, सुरेश कोळी, गोपीचंद सुरवाडे, नितीन चव्हाण, राजेश बोदड्डे, गणेश पाटील, प्रकाश चौधरी, नंदलाल पठ्ठे, गोपाळ व्यास आदींची उपस्थिती होती. दरम्यान, या प्रकरणाची तत्काळ दखल घेतली जाईल, असे आश्वासन सहा.अधीक्षक कुमार चिंथा यांनी दिले.

