पूर्व भागात वाढतेय राष्ट्रवादीच्या अॅड.रोहिणी खडसेंची ताकद
रावेर : जिल्हा बँक चेअरमन अॅड.रोहिणी खडसे या जिल्ह्यात सर्वाधिक राजकीयदृष्ट्या चर्चेला जाणार्या राष्ट्रवादीच्या युवा महिला नेत्या असून ज्यांच्यासाठी पक्षाच्या प्रदेशध्यक्षांना मुक्ताईनगर मतदारसंघात येऊन 2024 मध्ये व्याजासकट निवडणुकीची नुकसान भरपाई करून देण्याची हमी द्यावी लागली. गेल्या विधानसभा निवडणुकीत थोड्या मताने पराभूत होऊनदेखील सतत चर्चेत राहणार्या रोहिणी खडसेंची नाथाभाऊच्यां माध्यमातुन जळगावच्या पूर्व भागात त्यांची कमालीची ताकद वाढत चालली आहे. त्यामुळे येत्या काही काळात राजकारणात प्रचंड बदल या भागात दिसायला मिळणार आहे.
युवा महिला नेत्या म्हणून कार्य
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपा सोडल्यानंतर त्यांच्या सोबत त्यांची कन्या अॅड.रोहिणी खडसे यांनीदेखील राष्ट्रवादीत प्रवेश केला.एलएलबीचे शिक्षण झालेल्या रोहिणी खडसेंमध्ये नाथाभाऊंची छबी दिसते.रोहिणी खडसे यांचा वैयक्तिक मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाप्रमाणे रावेर-यावल व मलकापूर मतदारसंघावरदेखील प्रभाव आहे. अॅड.रोहिणी खडसे रावेर लोकसभेच्या केळी पट्यात नेहमी सक्रीय असतात महिलांचे कार्यक्रम असो की हळदी-कुंकवाचे कार्यक्रम त्या कार्यकर्त्यांच्या संपर्क असतात.नेहमी नविन आमदार निवडून देणार्या रावेर-यावल विधानसभेतदेखील रोहिणी खडसेंचा प्रचंड प्रभाव आहे. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नावाची चर्चा रावेरमधूनदेखील होती. जिल्हा बँकेच्या अध्यक्षा असलेल्या रोहिणी खडसे सध्या नाथांभाऊप्रमाणे थेट ग्राउंडवर कार्यकर्त्यांच्या संपर्कात असतात. या वर्षभरात बर्याच संस्थाच्या निवडणुका होऊ घातल्या आहे. या माध्यमातून रोहिणी खडसेदेखील राष्ट्रवादीला जास्तीत-जास्त जागा कश्या मिळतील यासाठी प्रयत्नशील असणार आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या ताकदवर युवा महिला राजकीय नेत्या म्हणून अॅड.रोहिणी खडसेंची ताकद जळगावच्या पूर्व भागात वाढत चालली आहे.

