थोरगव्हाणला वायरमनला मारहाण : तिघांविरुद्ध गुन्हा


यावल : तालुक्यातील थोरगव्हाण येथे तिघांनी वायरमनला मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी एक वाजता घडली. या प्रकरणी यावल पोलिसांत भूषण पंडित सोनवणे (26, रा.राजोरा) यांनी फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीतांना वीज बिल भरा अन्यथा वीज पुरवठा कापण्यात येईल असे सांगण्याचा राग येऊन तिघांनी वायरमनला मारहाण केल्याचा आरोप आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !