उचंद्याच्या तरुणाचा विहिरीत पडल्याने मृत्यू
मुक्ताईनगर : विहिरीत पडल्याने 23 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. समाधान उर्फ स्वप्नील प्रकाश पाटील (वय 23, रा.उचंदा) असे मृत युवकाचे नाव आहे. समाधान 15 रोजी सायंकाळी पाच वाजेपासून बाहेर पडला मात्र 16 रोजी समाधान याचा मृृृतदेह उचंदा शिवारातील मुकेश समाधान पाटील यांच्या शेतविहिरीत आढळला. समाधान याच्या पश्चात आई व विवाहित बहिण असा परीवार आहे.

