भुसावळात नाहाटा महाविद्यालयात अल्पदरात मिळणार दुर्मीळ पुस्तके
भुसावळ : कला विज्ञान आणि पु. ओ.नाहाटा महाविद्यालयातील जुन्या पुस्तकांचा खजिना अल्पशा दरात उपलब्ध होणार आहे. नाहाटा महाविद्यालयाच्या मध्यवर्ती ग्रंथालयातून जागेच्या अभावी रद्दबातल झालेल्या विविध विषयांची दुर्मीळ पुस्तके 22 ते 27 फेब्रुवारीदरम्यान सकाळी 10 ते दोन वाजेच्या दरम्यान महाविद्यायाच्या वाचन कक्षामध्ये अल्पशा दरात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. शहरातील वाचकप्रेमी, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.मीनाक्षी व्ही.वायकोळे, उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे, उपप्राचार्य डॉ.ए.डी.गोस्वामी, उपप्राचार्य डॉ.एन.ई.भंगाळे, उपग्रंथपाल आशिष व्ही.चौधरी यांनी केले आहे.

