पद्मालय येथे उद्या शिवसेनेची विधानसभा क्षेत्रनिहाय बैठक


भुसावळ : शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात रावेर लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख विलास पारकर व आमदार तथा जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून पुढे आलेले राज्यस्तरीय शिव संपर्क अभियान यशस्वी करण्यासाठी तातडीची बैठक शुक्रवार, 19 रोजी सकाळी अकरा ते पाच वाजेच्या दरम्यान स्वतंत्रपणे विधानसभा क्षेत्र निहाय होत आहे.

बैठकीला उपस्थिती अनिवार्य
या बैठकीला रावेर लोकसभा मतदार संघातील मुख्य पदाधिकारी, उपजिल्हा प्रमुख, शहरप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, विधानसभा क्षेत्र प्रमुख, तालुका संघटक या पदाधिकार्‍यांनी उपस्थिती द्यावी तसेच अनुपस्थित राहणार्‍या पदाधिकार्‍यांची लेखी नोंद घेतली जाणार असून रावेर लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणार्‍या भुसावळ, जामनेर, चोपडा, रावेर, मुक्ताईनगर या विधानसभा मतदारसंघातील निवडक पदाधिकार्‍यांनी शासकीय विश्रामगृह पद्मालय येथे वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन रावेर लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख विलास जी.पारकर व आमदार तथा जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !