उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाधिकारी पुरस्कार मिळाल्याबद्दल सुधीर तायडेंचा सत्कार


भुसावळ : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सुधीर रामदास तायडे यांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या स्वाक्षरीचे फोटो फ्रेम प्रमाणपत्र देवून भुसावळचे तहसीलदार दीपक धीवरे यांच्याहस्ते नायब तहसीलदार घुले व नायब तहसीलदार इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले होते. त्या निमित्ताने भुसावळ शिक्षक पतपेढीचे संचालक तथा माजी उपसभापती प्रदीप सोनवणे, चिटणीस राजू तडवी व जळगाव ग.स. सोसायटीचे संचालक योगेश इंगळे यांनी सुधीर तायडे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करत त्यांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

मतदान अधिकार्‍याचे कार्य उल्लेखनीय
मनोगतात सुधीर तायडे यांनी सांगितले की, प्रत्येक मतदान केंद्रस्तरीय अधिकार्‍यांचे कार्य उल्लेखनीयच आहे. निवडणूक विभागाकडून माझा करण्यात आलेला गौरव हा माझा वैयक्तिक गौरव नसून आपल्या सर्वांच्या वतीने प्रतिनिधीक स्वरुपात आपल्या सर्वांच्या सांघिक कार्याचाच हा गौरव आहे. आपापल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक कुटूंबातील एका व्यक्तीचा संपर्क मोबाईल क्रमांक असलेला व्हॉटसअप ग्रुप तयार करा. जेणेकरुन मतदारांच्या अडचणी समजून घेणे व नवमतदार नोंदणीसह, निवडणूक आयोगाचे विविध संदेश मतदारांपर्यंत पोहचवणे सोयीचे होईल, असही ते म्हणाले. कार्यक्रमाला योगेश मुस्कवाड, अमोल पाटील, सचिन पाटील इ. सह महसूलचे कर्मचारी व नवमतदार उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !