धक्कादायक ! : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 169 रुग्ण आढळले
जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 58 हजार 21 वर : एकाच दिवसात 55 रुग्णांची कोरोनावर मात
जळगाव : जिल्ह्यात गुरूवारी कोरोनाचे तब्बल 169 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे तर आतापर्यंत कोरोनामुळे 1369 रुग्णांचा मृत्यू ओढवला. जिल्ह्यात आतापर्यंत 58 हजार 21 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 55 हजार 985 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर गुरूवारी एकाच दिवसात 55 रुग्णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
गुरूवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 84
जळगाव ग्रामीण 05
भुसावळ 12
अमळनेर 05
चोपडा 04
पाचोरा 01
भडगाव 00
धरणगाव 05
यावल 01
एरंडोल 00
जामनेर 06
रावेर 03
पारोळा 07
चाळीसगाव 23
मुक्ताईनगर 10
बोदवड 00
अन्य जिल्हा 00

