सक्तीच्या वीज बिल वसुली विरोधात मुक्ताईनगरात धरणे आंदोलन


मुक्ताईनगर : शेतकर्‍यांकडून सक्तीच्या वीज बील वसुलीविरोधात राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड.पवनराजे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या दोन दिवसात सक्तीची वीजबिल वसुली न थांबवल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीतर्फे नुकतेच महावितरणच्या कृषी पंपांच्या वीज तोडणी भूमिकेच्या निषेधार्थ वीज कंपनीच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड.पवनराजे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत धरणे
आंदोलन करण्यात आले.

तर आंदोलन छेडण्याचा इशारा
शेतकर्‍यांचा खंडित केलेला वीजपुरवठा पूर्ववत सुरू न केल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शासनाला देण्यात आला. यावेळी महावितरणचे उपअभियंता महेश पाटील व पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांना निवेदन देणस्यात आले. निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅॅड.पवन पाटील, युवक अध्यक्ष सईद खान, कोषाध्यक्ष योगेश पाटील, प्रसिद्धी प्रमुख सारंगराजे, चिटणीस विनय पाटील, कोषाध्यक्ष शुभम पाटील, संदीप पाटोळे, गोकुळ अटकाळे, पंढरी पाटील, सुभाष पाटील, उपप्रसिद्धी प्रमुख कृष्णा पाटील, सचिन पाटील, एन.आर.पाटील, रोशन मिस्त्री, विनय पाटील, भोला पाटील, धम्मपाल कोंगे, योगेश कोळी, अकील खान, मनीष पाटील, चेतन पाटील, सोहेल खान, दीपक पाटील यांच्यासह शेतकरी बंधू व राष्ट्रवादी युवकचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !