सखी श्रावणी संस्थेतर्फे भिलमळी आदिवासी पाड्यावर हळदी कुंकूवाचा कार्यक्रम
भुसावळ : मकर संक्रांतीनिमित्त सौभाग्याचे लेणे म्हणून महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्थेतर्फे आदिवासी पाड्यावरील भिलमळी येथील महिलांसाठी राबवण्यात आला. यावेळी मासिक पाळी दरम्यान आपली स्वच्छता व काळजी कशी घ्यावी व सॅनेटरी पॅडचा वापर का करावा तसेच महिलांनी परीवारासोबतच स्वतःची सुध्दा काळजी घेणे गरजेचे आहे याबाबत थोडक्यात महत्वपूर्ण माहिती संस्थापक अध्यक्षा राजश्री नेवे यांनी दिली. यावेळी कोरोना नियमांचे पालन करण्यात आले. प्रसंगी राजश्री नेवे, मंदाकिनी केदारे, स्मिता माहुरकर, प्रिती आंबादे यांनी पाड्यातील शेकडो महिलांना सॅनेटरी नॅपकीनचे वाटप केले.

