दिव्यांगांसाठी झटणार्‍या मीनाक्षी निकम यांना ‘वसुंधरा रत्न’ पुरस्कार प्रदान


मला मिळालेला पुरस्कार हा चाळीसगावकरांचाच सन्मान : मीनाक्षी निकम

चाळीसगाव : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘वसुंधरा’ फाऊंडेशनतर्फे ’वसुंधरा रत्न’ 2021 पुरस्काराचे वितरण शिवजयंती दिनी सकाळी 11 वाजता करण्यात आले होते. यंदाचा 2021 हा पुरस्कार दिव्यांग बंधू-भगिनी तसेच घटस्फोटीत, विधवा गरीब महिला यांच्या सबलीकरणासाठी लढा देणार्‍या व खास महिलांसाठी सामाजिक कार्याची ज्योत लावली अशा दिव्यांग भगिनी मीनाक्षी निकम यांना अस्थिरोग तज्ञ डॉ महेश पाटील, योगाचार्य बाबासाहेब चंद्रात्रे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीला माता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
कार्यक्रमाला आमदार मंगेश चव्हाण, रिटायर्ड ब्रिगेडियर नातू सर, सर्पमित्र राजेश ठोंबरे, उमंग सृष्टी परिवाराच्या संस्थापिका संपदा उन्मेश पाटील, वसुंधरा फाउंडेशनच्या अध्यक्ष धरती सचिन पवार, जिजाऊ उत्सव समितीच्या सोनल साळुंखे, नगरसेविका सविता राजपूत, नगरसेवक घृष्णेश्वर पाटील उपस्थित होते.

पुरस्काराने वाढली जवाबदारी : मीनाक्षी निकम
सत्काराला उत्तर देताना मनोगतात मीनाक्षी निकम यांनी सांगितले की, चाळीसगावच्या मातीतील जनमाणसांनी मला पुरस्कार देऊन माझी अधिक जबाबदारी वाढवली असून चाळीसगाव वासीयांनी दिलेला पुरस्कार हा माझ्यासाठी खूप महत्वाचा असून मला नेहमीच प्रोत्साहन देणारा राहील तसेच हा पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणादायी असून हा पुरस्कार माझा नसून संपूर्ण चाळीसगावकरांचा असल्याचे त्यांनी सांगितले. या पुरस्कारात स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र सोबत दहा हजार रुपये शाल श्रीफळ देवून पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ महेश पाटील यांनी स्वयंदीप संस्थेचे कार्य अविरत चालते आणि आपल्याला नेहमीच सकारात्मक कार्याची प्रेरणा देते असे प्रतिपादन केले. आमदार मंगेश चव्हाण यांनी मीनाक्षी निकम यांचे कार्य अविरत प्रकारे चालत रहावे ते नेहमीच आपल्याला मार्गदर्शक ठरणार अशी त्यांनी आशा व्यक्त केली.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील, मंदार पाठक, योगेश राजधर पाटील, प्रमोद चव्हाण, सचिन दायमा, सुरेश शेटे, रोटरीचे अध्यक्ष प्रकाश कुलकर्णी, राजेंद्र कुलकर्णी, कवी रमेश पोद्दार, पप्पू राजपूत, बबडी शेख उपस्थित होते.

यांनी घेतले परीश्रम
कार्यक्रम यशस्वीतेसाठी वसुंधरा फाऊंडेशनचे सुनील भामरे, रविराज परदेशी, सचिन मोरे, अजय जोशी, धर्मराज खैरनार, मनोज पाटील, मनीष मगर, मुकेश गोसावी, सोनू अहिरे, भोजराज खैरे, सचिन पवार यांनी परीश्रम घेतले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !