तिसर्या रेल्वे लाईनीची आज व उद्या चाचणी
भुसावळ : मार्च अखेर भुसावळ-जळगाव तिसरी लाईन कार्यान्वीत होणार असून त्या संदर्भात चाचणी घेण्यासाठी डिझेल इंजिन शनिवार व रविवारी चालवण्यात येणार आहे. तिसर्या रेल्वे लाईनीच्या जवळपास कोणीही थांबू नये, असे आवाहन रेल्वे प्रशानाकडून केले आहे.
भुसावळ-जळगाव तिसरी रेल्वे लाईनीचे काम गेल्या चार वर्षापासून सुरू झाल्यानंतर भूसंपादनामुळे काही महिने हा प्रकल्प रेंगाळला होता मात्र पुन्हा त्याचे काम सुरू झाल्यावर हे काम आता आटोपले आहे.तिसर्या लाईनीमुळे गुजराथकडे जाणार्या रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार आहे.

