परसाडे येथे अल्पवयीन मुलीची आत्महत्या


यावल : तालुक्यातील परसाडे येथील करुणा बाळासाहेब भालेराव (14) या आठव्या इयत्तेत शिकणार्‍या अल्पवयीन मुलीने शुक्रवारी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना लक्षत येताच ग्रामस्थांच्या मदतीने यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.मयुर चौधरी यांनी तिला मृत घोषीत केले. शवविच्छेदन डॉ.मयुर चौधरी यांनी केले. अशोक शंकर भालेराव यांनी खबर दिल्यावरून यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी अस्लम खान हे करीत आहे. दरम्यान, अल्पवयीन शाळ्करी मुलीने आत्महत्या का केली ? याचे कारण कळू शकले नाही.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !